History of The Department
सन १९८४ पासूनच मराठी विषयाचे अध्यापन रे.फा.डाॅ. एलायस राॅड्रिक्ज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.रे.फा.डाॅ.एलायस राॅड्रिक्ज चा कार्यकाळ (१९८४-१९८६) पर्यंत होता.
१९८६ साली तृतीय वर्ष मराठी कलाशाखेची नवीन तुकडी तयार झाली.प्रा. अंजली दशपुत्रे (नाईक) यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली प्रथम २० विद्यार्थी तृतीय वर्ष कला या शाखेत मराठी हा विषय घेऊन अध्ययन करू लागले.
भाषा म्हणजे विचार, भावना,कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे.भाषा ही अर्जित संपत्ती आहे.अनेक बोलींचा समुच्चय प्रमाण भाषेत झालेला असतो. कोणतीही प्रमाण-भाषा जिवंत राहते व समृद्ध होते ती त्या भाषेत कार्यरत होणाऱ्या बोलीमधूनच !
बोलीभाषा या कोणत्याही प्रमाणभाषेच्या मूल शक्तीस्रोतच असतात. त्यामुळेच वसईतील वाडवळी बोलीतील ताजेपणा,लय घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेकडे नेता आले.
बुद्धी व भाषा यांचा सुरेख संगम करून प्रमाण मराठी भाषे सोबतच प्राचीन मराठी वाड्.मयाचा इतिहास, आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास,साहित्याचे विविध वाड्.मय प्रकारांचा जवळून परिचय विद्यार्थ्यांना झाला. साहित्याची समीक्षा कशी करायची? याचे बाळकडू मिळाले.