Department Of Marathi

मराठी विभाग

प्रास्ताविक

' शिक्षण ' हे मानवी विकासाचे अत्यंत महत्त्वाचे प्रभावी क्षेत्र आहे. शिक्षणाने माणसाच्या, समाजाच्या सर्वांगीण विकासाची कवाडे उघडी व्हावी, वसईतील तरुण-तरुणींना उच्च शिक्षणासाठी मुंबईला जावे लागू नये, त्यांची होणारी परवड थांबवावी म्हणून वसईतील शिक्षणमहर्षी रे.फा. जॉन रुमाओ व वसईतील सर्व ख्रिस्ती बांधवांनी मुंबईतील आर्चबिशप कार्डिनल सायमन पेमेंटा यांच्याशी सल्लामसलत करून वसईत ' संत गोन्सलो गार्सिया ' महाविद्यालयाचा प्रारंभ १९८४ साली केला. वसईतील सर्व ख्रिस्तीवासियांच्या योगदानाची नोंद महाविद्यालयाच्या इतिहासात घेतली गेली आहे. या सर्वांच्यामुळेच वसई गावातच सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याची सोय झाली, त्यामुळेच वसईचा आज शैक्षणिक कायापालट झालेला दिसतो आहे.

मराठी विभागाचा इतिहास

सन १९८४ पासूनच मराठी विषयाचे अध्यापन रे.फा.डाॅ. एलायस राॅड्रिक्ज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.रे.फा.डाॅ.एलायस राॅड्रिक्ज चा कार्यकाळ (१९८४-१९८६) पर्यंत होता.

१९८६ साली तृतीय वर्ष मराठी कलाशाखेची नवीन तुकडी तयार झाली.प्रा. अंजली दशपुत्रे (नाईक) यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली प्रथम २० विद्यार्थी तृतीय वर्ष कला या शाखेत मराठी हा विषय घेऊन अध्ययन करू लागले.

भाषा म्हणजे विचार, भावना,कल्पना व्यक्त करण्याचे साधन आहे.भाषा ही अर्जित संपत्ती आहे.अनेक बोलींचा समुच्चय प्रमाण भाषेत झालेला असतो. कोणतीही प्रमाण-भाषा जिवंत राहते व समृद्ध होते ती त्या भाषेत कार्यरत होणाऱ्या बोलीमधूनच !

बोलीभाषा या कोणत्याही प्रमाणभाषेच्या मूल शक्तीस्रोतच असतात. त्यामुळेच वसईतील वाडवळी बोलीतील ताजेपणा,लय घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाण भाषेकडे नेता आले.

बुद्धी व भाषा यांचा सुरेख संगम करून प्रमाण मराठी भाषे सोबतच प्राचीन मराठी वाड्.मयाचा इतिहास, आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास,साहित्याचे विविध वाड्.मय प्रकारांचा जवळून परिचय विद्यार्थ्यांना झाला. साहित्याची समीक्षा कशी करायची? याचे बाळकडू मिळाले.

सुविधा

संत गोन्सलो गार्सिया महाविद्यालयाच्या मराठी विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा, त्यांच्या बोलण्यात मोकळेपणा यावा, विद्यार्थ्यांवर साहित्यविषयक संस्कार व्हावेत या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.(निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व-स्पर्धा, काव्य-वाचन स्पर्धा, स्वरचित काव्य-स्पर्धा इ.)

सतत वर्षभर आमचे विद्यार्थी ' निर्मिती ' या भित्तीपत्रकातून आपले स्वतःचे लेख, कथा, कविता, चारोळी लिहितात. तसेच रंग-रेषा आकाराच्या कुंचल्यातून अनेक व्यक्तिचित्रे व निसर्ग-चित्रे काढून मोहवितात.

अनेक मान्यवर साहित्यिकांना आम्ही विद्यार्थ्यांना साहित्यरूपी पोषक जीवनमूल्ये मिळावीत म्हणून आम्ही त्यांचे व्याख्यान आयोजित करतो.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा दिन आमचे विद्यार्थी उत्साहाने साजरा करतात.

मराठी विभागातील प्राध्यापक -

  • प्रा. अंजली दशपुत्रे (नाईक)
    बी.ए, एम.ए,डी.एच.ई, एम.फिल
    ई-मेल: anjali.naik@ggcollege.in
  • डॉ. दिनेश काळे (तासिका तत्त्वावर)
    एम.ए (मराठी), एम.ए (समाजशास्त्र), बी. एम. सी (जनसंवाद), पी. एच.डी
    ई-मेल: dinesh.kale@ggcollege.in
  • प्रा. फेलिक्स डिसूझा ( तासिका तत्त्वावर)
    एम.ए,सेट
    ई-मेल: felix.desouza@ggcollege.in

स्पर्धा -

निबंध, काव्य ,हस्ताक्षर, काव्य-वाचन,स्वरचित-काव्य, चारोळी इ. स्पर्धांचे नियमित आयोजन केले जाते.

विद्यार्थ्यांवर लेखनरुपी संस्कार करण्यासाठी मान्यवर साहित्यिकांना आमंत्रित केले जाते.

english-dept-1
english-dept-1
english-dept-1
english-dept-1
english-dept-1
english-dept-1

संशोधन सुविधा -

आमच्या महाविद्यालयाचे प्रशस्त ग्रंथालय असून त्यात अनेक नाट्य,कथा-कादंबऱ्या,काव्य तसेच समीक्षात्मक पुस्तके उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःचा प्रोजेक्ट लिहितांना याचा खूप फायदा होतो. प्राध्यापक पदासाठी नेट-सेटचा अभ्यास विद्यार्थी ग्रंथालयातून पुस्तके घेऊन करतात.तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते. सूत्रसंचालनाचे सूत्र अवगत झाल्याने त्याचा फायदा मिडीया, शिक्षकी पेशा, नोकरी शोधण्यासाठी होतो.

माजी प्राध्यापक (निवृत्त)

१) रे.फा.डाॅ.साॅलोमन राॅड्रिक्ज (कार्यकाळ:- १९८९-२०१३)

२) डॉ.प्रा. सिसिलिया कार्व्हालो (कार्यकाळ:- १९९२-२०१७)

माजी विद्यार्थी

  • प्रोफेसर डॉ. जोन सॅलोमी
    (सेंट ट्रिझा बी.एड. कॉलेज सांताक्रुज)
    ई-मेल: joansalome13@gmail.com
  • प्रोफेसर डॉ. एलविना परेरा
    (सेंट झेवियर कॉलेज ऑफ एज्युकेशन)
    ई-मेल: pereiraelvina@gmail.com
  • निलेश गोपनारायण
    (नट, दिग्दर्शक, एकांकिका लेखक)
    ई-मेल: nileshgopnarayan03@gmail.com